📘भारत सरकार जलशक्ती मंत्रालयाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण📕 जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने महाराष्ट्रातून ५० शिक्षकांची निवड करून त्यांना राष्ट्रीय पातळीवर पुणे येथे पाण्याचा योग्य वापर ,पाणी प्रदूषण कसे रोखावे , पाण्याचे भविष्यकाळातील येणारे संकट व उपाययोजना याबाबत शाळेतून कोणकोणते उपक्रम राबवून विद्यार्थ्यांवर तसे कृतिशील संस्कार करता येतील याबाबत आम्हाला पिपीटीद्वारे अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन भारत सरकारच्या नॅशनल वॉटर अकादमीचे डेप्युटी डायरेक्टर मा. मिलिंद पान पाटील साहेब, डेप्युटी डायरेक्टर मा.एस.पी.सिंग साहेब, डेप्युटी डायरेक्टर मा.के.एस.चैतन्यसाहेब, डेप्युटी डायरेक्टर मा.जी.श्रीनिवानूसुलू साहेब यांनी केले. यावेळी भारत सरकारच्या वतीने राज्यातील शिक्षकांना नॅशनल वॉटर अकादमीचे संचालक मा.डी.एस.चासकर साहेब यांनी विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ